कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, २१ एप्रिल, २०२०

जग हे कुणाचे



जग हे कुणाचे


संभ्रमित मन
जग हे कुणाचे
जाण ते केवळ
दिल्याघेतल्याचे...१

सुख आणि दुःख
वलय मायेचे
लाटांनी सागरी
पुन्हा विरायचे...२

व्यर्थ अभिमान
टाक ती वासना
सोडूनी बद्धता
सावर जीवना...३

मिथ्या हे जगत
मृगजळी नाव
युगे लोटलेली
सापडेना ठाव...४

कुणी ना कुणाचे
सारथी नसो 'स्वार्थ'
गुंत्यातून पार
नेई परमार्थ...५

कर्तव्याची वाट
चाल निरंतर
साध कर्मयोग
मुक्तीचे हे सार...६


रचना
©शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड
२०.०४.२०२०