कवाडं
सताड खुली केलीत कवाडे
सृष्टीने पावलोपावली
म्हणूनच तर किंमत नाही तुला
कशी साहत असेल ती माऊली...१
देऊ केलाय प्राणवायू
प्रत्येक देहधाऱ्यास जरी
पण दात्यांच्याच जिव्हारी
बिनधास्त घालतो कुठारी...२
जीवन हे ठायीठायी
नद्या सागरांत वाहे
प्रदुषित करणे तयांस
निर्लज्जपणाचा कळस आहे... ३
तिजविन का घास लाभतो
उदरभरण यज्ञकर्म जाणा
गरजेपुरते जरुर घ्या पण
वाचवा मोत्यासम दाणा...४
बंद झाले जर कवाड एकही
विचारही भयावह आहे हा
अंतरी जागवून संवेदना
कृतज्ञतेत जरा भिजून पहा...५
रचना
©शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका मालेगाव खुर्द बीड
दि 18.04.20
सताड खुली केलीत कवाडे
सृष्टीने पावलोपावली
म्हणूनच तर किंमत नाही तुला
कशी साहत असेल ती माऊली...१
देऊ केलाय प्राणवायू
प्रत्येक देहधाऱ्यास जरी
पण दात्यांच्याच जिव्हारी
बिनधास्त घालतो कुठारी...२
जीवन हे ठायीठायी
नद्या सागरांत वाहे
प्रदुषित करणे तयांस
निर्लज्जपणाचा कळस आहे... ३
तिजविन का घास लाभतो
उदरभरण यज्ञकर्म जाणा
गरजेपुरते जरुर घ्या पण
वाचवा मोत्यासम दाणा...४
बंद झाले जर कवाड एकही
विचारही भयावह आहे हा
अंतरी जागवून संवेदना
कृतज्ञतेत जरा भिजून पहा...५
रचना
©शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका मालेगाव खुर्द बीड
दि 18.04.20