भूक
"भूक लागली वं आई..."
या शब्दाईलेच भेत जाय माई माय..
जीवाचं पानीच हो ये तिच्या
अन् बयाबयाच इकडे तिकडे पायत जाय...
"हो रे राजा.. पानी पे.... आत्ता येतीन तुये बाबा" म्हणून घंटा घंटा लोटत जाय...
बाबा कदीच झाकट पळेलोक येत नसत..
तरी बी दारात उबं राउन सारेच दूर दूर नजर जाये लोक पायत रायत...
....
अन् आले तरी लायन्या पिंट्या,संज्या बालीले भेटेलोक सरुन जाये भाकर...
कदीकदीच माया पोटाची न् तिची गाटभेट होये..
मास्तर म्हणे शीक... माय म्हणे शीक...
तेच तुले तारीन अन् तुया पोटातल्या आगीले मारीन...
तवापासून भूक लागली होती शिक्षणाची...
उपाशी पोटाची आता फिकर न्होती
शब्दालेच म्या भाकर म्हणून खाल्लं
अन् लय कठीन दिवस गेले... पन् आज त्याचं चीज झालं...
घर भरेल हाय आज... कुटीच काई कमी नाई..भुकीनं जीणं शिकोलं.. हेई काई खोटं नाई...
पन मायची भूक इझोता नाई आली
म्हणून अजुनबी मनाले मन खात रायते...
अन् कोनतीच माय तरसू नाई भाकरीले... हे नजर फक्त शोधत रायते...
रचना
✍🏻शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका
जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड
दि. १३.०३.२०२०