भारतभूचे वीर खरे
काळोखाच्या काळजात
ज्ञानसंस्कारदीप लावूया
काळाच्या छाताडावरती
पाय रोवून उभे ठाकूया...
श्वास होऊनी कोसळल्यांचा
आस पेरुया डोळ्यांत
जगण्याची नवखी रीत सांगूया
आज मृत्यूच्याही कानात...
डगमगणारे भ्याड न आम्ही
सांगा परक्यांच्या प्याद्यांना
नेक इरादे बुलंद अमुचे
सहजे चिरडूया साऱ्यांना...
विकारांचे दास न आम्ही
भारतमातेचे वीर खरे
काळोखाच्या काळजात
ज्ञानसंस्कारदीप लावूया
काळाच्या छाताडावरती
पाय रोवून उभे ठाकूया...
श्वास होऊनी कोसळल्यांचा
आस पेरुया डोळ्यांत
जगण्याची नवखी रीत सांगूया
आज मृत्यूच्याही कानात...
डगमगणारे भ्याड न आम्ही
सांगा परक्यांच्या प्याद्यांना
नेक इरादे बुलंद अमुचे
सहजे चिरडूया साऱ्यांना...
विकारांचे दास न आम्ही
भारतमातेचे वीर खरे
देशासाठी प्राण वेचूनी
शत्रूंस चारितो आम्ही खडे...
रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि १७.०३.२०२०
शत्रूंस चारितो आम्ही खडे...
रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि १७.०३.२०२०