*येई सावळे विठाई*
पुष्पराज मनमोही
जगी प्रतिक प्रेमाचा
सजवला हो जयाने
आज गाभारा देवाचा...🌹
सजविता विश्वंभरा
राजा स्वयेंच सजला
अल्पायुषी जो प्रसून
बघा पावनचि झाला...🌹
भाग्य त्यांसि महाथोर
काय आजची लाभावे
देई संकेत मानवा
अनासक्त तू जगावे...🌹
माझे सावळे विठाई
देई तुझा मना ध्यास
नाम सौरभात माझा
भिजव ना श्वास श्वास...🌹
धन्य धन्य होवो माझा
एक एक दिन क्षण
जाता पावलोपावली
नाम पेरत जाईन...🌹
माझा 'मी' ही बा तुझ्यात
असा विरावा केशवा
जसा पुष्पदळांमध्ये
मंद गंध तो भिनावा...🌹
वेड लागो मज ऐसे
अन् नुरावेच भान
आत्मज्ञान जागवी तू
'हर' हरीहरा मन...🌹
मनाचिया गाभाऱ्यात
नामसुमांची आरास
युगायुगांची पुरवी
माये येऊनिया आस... 🌹
तुझ्या मायानगरीत
मोहवते मृगजळ
धाव घेई गे कान्हाई
आता दवड ना पळ 🌹
✍🏻 *शिल्पा म वाघमारे*
सहशिक्षिका, जि प प्रा शाळा, मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड
दि. ४.३.२०२०
पुष्पराज मनमोही
जगी प्रतिक प्रेमाचा
सजवला हो जयाने
आज गाभारा देवाचा...🌹
सजविता विश्वंभरा
राजा स्वयेंच सजला
अल्पायुषी जो प्रसून
बघा पावनचि झाला...🌹
भाग्य त्यांसि महाथोर
काय आजची लाभावे
देई संकेत मानवा
अनासक्त तू जगावे...🌹
माझे सावळे विठाई
देई तुझा मना ध्यास
नाम सौरभात माझा
भिजव ना श्वास श्वास...🌹
धन्य धन्य होवो माझा
एक एक दिन क्षण
जाता पावलोपावली
नाम पेरत जाईन...🌹
माझा 'मी' ही बा तुझ्यात
असा विरावा केशवा
जसा पुष्पदळांमध्ये
मंद गंध तो भिनावा...🌹
वेड लागो मज ऐसे
अन् नुरावेच भान
आत्मज्ञान जागवी तू
'हर' हरीहरा मन...🌹
मनाचिया गाभाऱ्यात
नामसुमांची आरास
युगायुगांची पुरवी
माये येऊनिया आस... 🌹
तुझ्या मायानगरीत
मोहवते मृगजळ
धाव घेई गे कान्हाई
आता दवड ना पळ 🌹
✍🏻 *शिल्पा म वाघमारे*
सहशिक्षिका, जि प प्रा शाळा, मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड
दि. ४.३.२०२०
