कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

🎵सोहळा... ATM चा.. गीत

सोहळा... ATMचा पंढरपूर 

आज पंढरपूरात ज्ञानजागर मांडला
विठूमाऊलीच्या पायी ज्ञानसागर सांडला...
.... We are one... (4)||धृ||

हम टिचर है हटके...
सारे बाजूला व्हा रे जरा
अफलातून अमुचे फंडे
प्रगत कराया शाळेला
ATM चा आवाज हो
आसमंताला भिडला...||१||

शिक्षणाच्या वारीचे आम्ही वारकरी पहिले
हाव नाही आम्हा ठावं
श्वास जन्माचे वाहिले
स्वार्थ-अहम् कधीचा
पायाखाली हो चिरडला...||२||

We are one ललकारी
दाही दिशांत दुमदुमली
दादा ताईंच्या रुपानं
तोरणं सोहळ्याची सजली
प्रेमभऱ्या या भेटीनं दिस गालात हासला....||३||

गीत रचना
शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड
दि. १९.०३.२०