कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, १० मार्च, २०२०

मुरारी

मुरारी...

मला हे मुरारी तुझे वेड लागे
तुझ्या भोवती गुंतले प्रेमधागे
मनाचे तुला मी कसे हाल सांगू
विकारी मनाला करी तूच जागे...

तुझ्या भोवताली सुखाचीच छाया
दुधारी विकारे जगा वेढलेले
नकोसेच  झाले अता भार सारे
सुखे बेगडी देखिता मी गळाले...

जिथे पावले ही  निघाली निघाली
नसे त्यांस थांबा मधे हे मुरारी
विरुदे तुझ्या आत्मतेजात आता
नको चालवू काळजात कुठारी

रचना
शिल्पा म वाघमारे
स शि बीड
दि २४.१२.२०१९