भाव मनातले....
जन्मदिन हा प्रत्येकासाठी विशेष असतो... अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत.
काल माझ्या जन्मदिनानिमित्त आपण सर्वांनी अनपेक्षित व अविस्मरणीय अशा पद्धतीने माझा जन्मदिन साजरा केल्याबद्दल तसेच आनंद वर्षावाबद्दल मी सर्वप्रथम धन्यवाद देते.
तसेच मला भरभरून दिलेल्या शुभेच्छा व प्रेम यासाठीही सर्वांचे मनापासून आभार.
आपले निर्व्याज प्रेम सदैव माझ्या मनात एक अनोखीच ऊर्जा निर्माण करणारे ठरते.
कारण निरागस प्रेम व तोंडभरून कौतुक व शुभाशीर्वाद तसेच सत्प्रेरणा मिळणं हे या बेगडी जगात सर्वांच्या नशीबात नाही.
आपल्यासम निरपेक्ष मित्र लाभले हा खरचं खूप सुंदर अनुभव आहे माझ्यासाठी.
त्याशिवाय मी ही माझ्यात शून्य आहे.
तरीही माझ्याकडून आपले मन दुखावल्या गेले असेल तर क्षमा मागते.
आणि हिच प्रेरणा सकारात्मक ऊर्जा बनते आहे... आणि हे *शिल्प* तुम्हामुळे घडते आहे..
आपली साथ माझ्या जीवनात कायम राहो... हिच विठूचरणी प्रार्थना.
पुनश्च आभार आभार आभार.
कर्तव्यापथावर चालण्यास निरंतर
तुम्ही प्रेरणेचं चांदणं विखुरता
असीम आसमंती झेपावयास
तुम्ही ऊर्जादायी पंख बनता
दिल्या-घेतल्याच्या रुक्ष या जगती
भाग्यवंत मी की एकमेव जणू
किमयागार निर्मिकासम क्षणोक्षण
निरभ्र आभाळातूनही सुखसरी होऊन बरसता...
🙏🏻🙏🏻🙏🏻