भय इथले संपत नाही...
डोळ्यातील आसवांना मिळेल का रे उसंत
भुमातेचा माझ्या कुणी चोरला वसंत...|| धृ||
डोळ्यातील आसवांना मिळेल का रे उसंत
भुमातेचा माझ्या कुणी चोरला वसंत...|| धृ||
तुफान वादळाची आज फक्त चलती
संभ्रमित सारे ही व्यथा हाय भलती...
कोरले विश्व असले, जशी वाळवी उपजली
त्राही त्राही जनता, तुकड्यात रे विखुरली...
कधी विझेल हा वणवा, कशी शमेल ही खंत
भुमातेचा माझ्या कुणी चोरला वसंत... १
तन मन ही खचलेले, प्रभू मार्ग तूच दावी
हे निर्गुणा, हे आद्द्या नौका ही पार लावी
नित मृत्यूचाच धसका, भयभीत काळजाला
क्षण लोटती समोरी घेऊन सावजाला
आरंभले हे पर्व, कोठेे असेल अंत
भुमातेचा माझ्या कुणी चोरला वसंत... २
हे निर्गुणा, हे आद्द्या नौका ही पार लावी
नित मृत्यूचाच धसका, भयभीत काळजाला
क्षण लोटती समोरी घेऊन सावजाला
आरंभले हे पर्व, कोठेे असेल अंत
भुमातेचा माझ्या कुणी चोरला वसंत... २
भय इथले संपत नाही, प्रश्नांत पार बुडलो
मान्य सत्य हेच आम्हीच रे बिघडलो
हे रोजचेच झाले तरी होई ना सराव
गर्तेत सापडे का माझा हा विश्व गाव
थांबवी झंझवाता, प्रकाश दे अनंत
भुमातेचा माझ्या कुणी चोरला वसंत... ३
तू जळीस्थळी जर का आहेस दाटलेला
तटस्थ का उभा तू, हृदयात आटलेला
आवर ना पसारा,फेऱ्यास चुकवोनी
मी वाट पाहे उभी, पदरास पसरोनी
नवप्रभातेज आशा, एक तूच कृपावंत
तटस्थ का उभा तू, हृदयात आटलेला
आवर ना पसारा,फेऱ्यास चुकवोनी
मी वाट पाहे उभी, पदरास पसरोनी
नवप्रभातेज आशा, एक तूच कृपावंत
भुमातेचा माझ्या कुणी चोरला वसंत... ४
©शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि. ३०.०३.२०२०