हरवते तुझ्यात मी जेव्हा
हरवते तुझ्यात मी जेव्हा रे
पापणीस सवड ना झुकण्याची
प्रेमसुधा संथ वाहते अंतरी
ती घटिका तुझ्यात गवसण्याची... १
तू ओठांची पाकळी अलगद
टिपतोस तुझिया अधरांनी
उचंबळून येती तरंगलहरी
मलमली माझिया तनुवरी...२
स्पर्श गहिरा करुन जातो
काहिली मनाची राजसा
मिटून डोळे सामावते तुझ्यात
क्षण तो खुलवी शृंगाररसा...३
गंध जणू की बकुळ फुलांच्या
उपवनी नाचते मी मयुरी
हाय कशी ती का रे तळमळ
रोमरोमी उठतसे शिरशिरी...४
हरवते गवसते पुन्हा पुन्हा
तरी ओढ पुन्हा का ओढतसे
रातराणीच्या फुलांसवे मी
रोज नव्याने उमलतसे... ५
काव्यरचना
©शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि. ३१.०३.२०२०
हरवते तुझ्यात मी जेव्हा रे
पापणीस सवड ना झुकण्याची
प्रेमसुधा संथ वाहते अंतरी
ती घटिका तुझ्यात गवसण्याची... १
तू ओठांची पाकळी अलगद
टिपतोस तुझिया अधरांनी
उचंबळून येती तरंगलहरी
मलमली माझिया तनुवरी...२
स्पर्श गहिरा करुन जातो
काहिली मनाची राजसा
मिटून डोळे सामावते तुझ्यात
क्षण तो खुलवी शृंगाररसा...३
गंध जणू की बकुळ फुलांच्या
उपवनी नाचते मी मयुरी
हाय कशी ती का रे तळमळ
रोमरोमी उठतसे शिरशिरी...४
हरवते गवसते पुन्हा पुन्हा
तरी ओढ पुन्हा का ओढतसे
रातराणीच्या फुलांसवे मी
रोज नव्याने उमलतसे... ५
काव्यरचना
©शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि. ३१.०३.२०२०