ऊरफटी...
ऊरफाटी चालली दुनिया...असं कईतरी झालं
मी तं म्हनतो काईतरी नाई...
भलकसंच भयानक झालं...
आज माय धरतीले
माय फक्त म्हणतो आमी
पन तिच्यावर जन्मभार किती
करते काय याचा ईचार कोनी...
नाक तठी आॅक्शीजन
भेटून रायला आपल्याले
बुकच्या बुक वाचतो न् परदुशन करतो..
पन किंमत नाईच हो कोनाले...
मानूस मानसासंग...फक्त
स्वार्थापुरताच उरला हो
भ्रष्टाचाराचं खाऊन खाऊन
जठी नाई तठी सुटला हो
उरफटा चालला तूच मानसा
निसर्गाले बदनाम करु नको
तूच तुया भविष्याचं चित्र
काया रंगानं रे रंगवू नको...
रचना
©शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि १६.०३.२०