अपेक्षांचे ओझे...
लादत असतो पालक
लेकरांवर ओझे अपेक्षांचे
अविचारास्तव कारण होते
त्यांच्या कोमेजलेल्या मनाचे...
विचार फक्त एकतर्फी
करतात ते जीवनाचा
साधन बनवून लेकराला
प्रारंभ होतो या खेळाचा...
मानगुटीवर निरागस त्या
जोखड थेट घातले जाते
आवड निवडीचे स्वातंत्र्य हिरावून
ईप्सित तेवढे साधले जाते...
अशी वेळ समोर येते
की तेलही जातं, तूपही जातं
होत्याचं नव्हतं होऊन मन
पत्त्याच्या बंगल्यागत कोसळतं...
आजकालच्या जगात हे
सामान्य झाल्यागत वाटतयं
दिखाऊपणापायी माणूस
अपेक्षांचं ओझं वाहतोय...
मनं फुलवा ती कळीगत
गंधीत जीवनोद्यानासाठी
आकाश करा हो मोकळे
झेपावणाऱ्या पाखरांसाठी...
रचना
शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि २७.०१.२०२०
सदस्य मराठीचे शिलेदार समूह
लादत असतो पालक
लेकरांवर ओझे अपेक्षांचे
अविचारास्तव कारण होते
त्यांच्या कोमेजलेल्या मनाचे...
विचार फक्त एकतर्फी
करतात ते जीवनाचा
साधन बनवून लेकराला
प्रारंभ होतो या खेळाचा...
मानगुटीवर निरागस त्या
जोखड थेट घातले जाते
आवड निवडीचे स्वातंत्र्य हिरावून
ईप्सित तेवढे साधले जाते...
अशी वेळ समोर येते
की तेलही जातं, तूपही जातं
होत्याचं नव्हतं होऊन मन
पत्त्याच्या बंगल्यागत कोसळतं...
आजकालच्या जगात हे
सामान्य झाल्यागत वाटतयं
दिखाऊपणापायी माणूस
अपेक्षांचं ओझं वाहतोय...
मनं फुलवा ती कळीगत
गंधीत जीवनोद्यानासाठी
आकाश करा हो मोकळे
झेपावणाऱ्या पाखरांसाठी...
रचना
शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि २७.०१.२०२०
सदस्य मराठीचे शिलेदार समूह