कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, १० मार्च, २०२०

छंदरंग हरीनामाचा



छंद हरीनामाचा

मनातल्या छंदांचे
भावनेतल्या गंधांचे
रंग एकच होऊ दे
कोमल त्या बंधांचे...१

स्पर्शून ये एकदा अंतरास
निर्मळ करी त्या दर्पणास
पाझर त्या प्रीतामृताचा
मुक्त देऊ कर जगतास...२

हात हाती गुंफुनिया रे 
नवशिल्पांत स्वंये घडूया
नामरंगांत रंगूया सारे
निर्विकार भाव जपूया...३

रंगुनी नाम रंगात मना
लुब्ध व्हावे निर्गुणात
वेड लागेल ते लागू दे
स्थिरावून 'स्व' ओंकारात....४

गुंतवी चपळ वाऱ्याहूनी जरी
तयास ना मग विषय दिसे 
हरी नाम हे एक पुरेसे 
हा छंद जीवाला लावी पिसे... ५


रचना
©शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड. दि. १०.०३.२०