कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२०

🚩शूर तानाजी मालुसरे

शूर तानाजी मालुसरे

खांद्यावर पेलले आव्हान ज्याने
 विश्वासू मावळा तो शिवबाचा
क्षणीकही विचार नव्हता मनी
लाडक्या रायबाच्या लग्नाचा... १

वाहिले सर्वस्व चरणी मायभूच्या
असा तानाजी वीर रांगडा गडी
विश्वास अटळ तो सार्थ ठरवला
स्वराज्याची बसवण्या घडी...२

अखेरच्या श्वासांतही त्याला
स्वराज्य चित्र दिसत होते.
कोंढाणा जिंकून पठ्ठ्याने
वीरमरण पत्करले होते...३

रचना
शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि ४.२.२०२०