कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२०

आनंदघन

माणसाने.....

हृदयगाभारी पावित्र्याने
आत्मतेजास जागवावे
तुझ्यातल्या माणसाठायी
प्रत्येकाने नतमस्तक व्हावे...१

आधार हो, धीर हो दुर्बलांंचा
 पाऊलखुणांनी सुवासिक व्हावे
श्वास हो मरणासन्नांचा असा
की तत्क्षणांचे संगीत व्हावे....२

घास होऊन मुखीचा कधी
क्षुधेलाही कधी लाजवावे
आशीर्वतांचे डोई सडे की
जन्मी जीवनाने समृद्ध व्हावे...३

माणसाने माणसासाठी सदोदित
ज्योत समईची होऊन जळावे
विषय पतंग जाळीत जाता
सहजे तूफानांस पेलावे...४

देहभान हरपून अर्पावे मनही
निर्भेळ आनंदघन व्हावे
 निरागस निर्विकार मूळ हे
जडाला जाणवून द्यावे... ५

भव तरताना निरपेक्ष भावे
दात्यासम तू देत रहावे
श्वासांचे अविरत जाणे येणे
फक्त यांस का जीवन म्हणावे?.. ६

रचना
शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि ८.२.२०