काव्यमय कोडे...
सूर्य
तुझ्या रोज येण्याने जणू
पुन्हा जन्म घेते सृष्टी
प्राची हसते निरागस गाली
आनंदी सुमांची होते वृष्टी...१
अमृतस्पर्शाने तुझ्याच
नवती होती हरित पाती
पल्लवीत होऊन आशा पुन्हा
फळे लगडती, फुले बहरती...२
तृणावरचे दवं की मोती
क्षणात समरस होऊनी
झेपावती पाखरे नभी
पिल्लांत जीव गुंतवूनी ...३
अर्घ्य कुणाचे कृतज्ञ भावे
वंदनीय तुझा त्याग रे
अचूक साधून काळ तू येशी
म्हणूनच आलबेल सारे... ४
तुझ्या कारणे श्वास आमुचे
तुजविण जीवन हे व्यर्थ
समतोल राखशी महीधरा
तूच या जीवनाचा अर्थ... ५
रचना
©शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि. ०१.०२.२०२०
सूर्य
तुझ्या रोज येण्याने जणू
पुन्हा जन्म घेते सृष्टी
प्राची हसते निरागस गाली
आनंदी सुमांची होते वृष्टी...१
अमृतस्पर्शाने तुझ्याच
नवती होती हरित पाती
पल्लवीत होऊन आशा पुन्हा
फळे लगडती, फुले बहरती...२
तृणावरचे दवं की मोती
क्षणात समरस होऊनी
झेपावती पाखरे नभी
पिल्लांत जीव गुंतवूनी ...३
अर्घ्य कुणाचे कृतज्ञ भावे
वंदनीय तुझा त्याग रे
अचूक साधून काळ तू येशी
म्हणूनच आलबेल सारे... ४
तुझ्या कारणे श्वास आमुचे
तुजविण जीवन हे व्यर्थ
समतोल राखशी महीधरा
तूच या जीवनाचा अर्थ... ५
रचना
©शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका बीड
दि. ०१.०२.२०२०