शेत शिवार...
कर्तव्याची करुनी पुर्ती
रवी निघाला अस्ताला
चला राजा माझ्या सर्जा
घेण्या उसंत थोडी जीवाला... 🐂
उद्याच्या पहाटेला
पुन्हा घालाया दंडवत
येऊ भास्कराच्या संगे
नवी करु सुरुवात... 🌞
रानपाखरांची शीळ
माझ्या मना रिझविते
जीवलग तेच खरे
शीण धग विझविते🦅
अंगणात गगनाच्या
सप्तरंगांची रांगोळी
आनंदाचा मनी रंग
देवाजीनं भरली झोळी🌈
घास तुमच्या कष्टाचाच
जगाच्या या उदरात
माय धरा महादानी
घाली सोनं पदरात... 💫
सांज झाली पाखरांनो
परता सारे घरट्याला
चिल्यापिल्लांच्या नजरा
लागल्याती झुरणीला 🏡
रचना
© *शिल्पा म.वाघमारे*
सहशिक्षिका जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि 26.03.2019
कर्तव्याची करुनी पुर्ती
रवी निघाला अस्ताला
चला राजा माझ्या सर्जा
घेण्या उसंत थोडी जीवाला... 🐂
उद्याच्या पहाटेला
पुन्हा घालाया दंडवत
येऊ भास्कराच्या संगे
नवी करु सुरुवात... 🌞
रानपाखरांची शीळ
माझ्या मना रिझविते
जीवलग तेच खरे
शीण धग विझविते🦅
अंगणात गगनाच्या
सप्तरंगांची रांगोळी
आनंदाचा मनी रंग
देवाजीनं भरली झोळी🌈
घास तुमच्या कष्टाचाच
जगाच्या या उदरात
माय धरा महादानी
घाली सोनं पदरात... 💫
सांज झाली पाखरांनो
परता सारे घरट्याला
चिल्यापिल्लांच्या नजरा
लागल्याती झुरणीला 🏡
रचना
© *शिल्पा म.वाघमारे*
सहशिक्षिका जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि 26.03.2019