माय सावित्री
भार्या ज्योतीची
मशाल जी क्रांतीची
माय सावित्री... १
असह्य वार
झेलत देहावर
अद्भूता शक्ती... २
विद्येचा उदय
लेकीसाठी अभय
ज्ञानशारदा... ३
स्वतेज आभा
दिव्य अशी प्रतिभा
सूर्य नमला... ४
तू लावलेली
पण'ती' सज्ज झाली
अज्ञानरणी... ५
अक्षरदीप
जीवनी चेतवले
विश्व दीपले... ६
फुलल्या कळ्या
काव्यफुले ओवत
ज्ञानोद्यानात... ७
खेचलीस तू
काळोखाची काजळी
श्वास पाजळी... ८
साऊच्या लेकी
निडर निष्ठावंत
नुरली भ्रांत... ९
रचना
©शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका मालेगाव खुर्द,
ता गेवराई जि बीड
दि. ३.१.२०
भार्या ज्योतीची
मशाल जी क्रांतीची
माय सावित्री... १
असह्य वार
झेलत देहावर
अद्भूता शक्ती... २
विद्येचा उदय
लेकीसाठी अभय
ज्ञानशारदा... ३
स्वतेज आभा
दिव्य अशी प्रतिभा
सूर्य नमला... ४
तू लावलेली
पण'ती' सज्ज झाली
अज्ञानरणी... ५
अक्षरदीप
जीवनी चेतवले
विश्व दीपले... ६
फुलल्या कळ्या
काव्यफुले ओवत
ज्ञानोद्यानात... ७
खेचलीस तू
काळोखाची काजळी
श्वास पाजळी... ८
साऊच्या लेकी
निडर निष्ठावंत
नुरली भ्रांत... ९
रचना
©शिल्पा म वाघमारे
सहशिक्षिका मालेगाव खुर्द,
ता गेवराई जि बीड
दि. ३.१.२०