कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

गुरुवार, ५ डिसेंबर, २०१९

काया मातीत...


.....

काया मातीत मातीत

काया मातीत मातीत 
बीज रुजतं कुशीतं
आस उद्याची जपतं
गाणं गातो रे खुशीत... १

वर येता.. येता कैक
तूफानाशी झगळते
पाय तरी मातीमंदी
जीणं मले शिकवते...२

वाढ वाढता वाढता
देते फुलं फळं छाया
लाव तुही माणसा रे
उलशीक त्याले माया...३

देत जाते सारं सारं
कायज त्याचं अभायाचं
माय त्याची कायी माती
लेते लेणं संस्काराचं.. ४

रचना
शिल्पा म वाघमारे
स शि बीड
दि ५.१२.२०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: