कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

दीपस्तंभ बाबासाहेब... भीमराव ..

गीत

दीपस्तंभ बाबा...


तू चंदनाप्रमाणे झिजला अपार बाबा
केलेस तू सुगंधी अमुचे शिवार बाबा ध्रु

नव्हताच येथ दर्दी माणूस माणसाचा
असह्य भार हृदयी त्या दुःख वेदनांचा
झालास दीपस्तंभ, त्या वादळात बाबा
केलेस तू सुगंधी अमुचे शिवार बाबा...१

अनोळखी पथावर,तू एक ओळखीचा
ज्ञानवाट दावुनी तू,झालास देव अमुचा
निरपेक्ष सेवेची, देऊन मशाल बाबा
केलेस तू सुगंधी अमुचे शिवार बाबा... २

जातीभेदांची रोपे, फेकली तू उपटूनी
सद्धर्म पेरलास, तू मानवाच्या मनी
मानवता बहराया,आदर्श दिला बाबा
केलेस तू सुगंधी अमुचे शिवार बाबा... ३

शिल्पकार घटनेचा,अद्वितीय व्यक्तीमत्व
तुजसम होणे नाही,दिप्तिमान विद्वत्व
झुंजलास अंताच्या, तू श्वासावत बाबा
केलेस तू सुगंधी अमुचे शिवार बाबा...४

रचना
©शिल्पा म वाघमारे
स शिक्षिका जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड
दि ६.१२.२०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: