अभंग रचना
कृष्णार्पित...
माझिया मना तू
आठवावा कृष्ण
साठवावा कृष्ण
श्वासांसवे... १
सावळे ते रुप
मोहक साजिरं
लावी मना घोर
माझा कृष्ण... २
कर्मकर्तव्यात
संसारा सांधले
गीताख्य वर्णिले
माधवाने... ३
जाणवाया कृष्ण
सांडा क्रोधकाम
कर्म ते निष्काम
कृष्णार्पित... ४
व्यापला तयाने
मनाचा गाभारा
देहभाव सारा
वाहियला... ५
नाम मोतीयांची
करिते गुंफण
अमृतसिंचन
जन्मोजन्मी... ६
न लगे रे मोक्ष
कृपाळा केशवा
तुझे पायी सेवा
घडो सदा... ७
अद्वैता, चैतन्या
तूच विश्वाधार
विश्वास आगार
वनमाळी...८
बांधूनी बंध हे
मुक्त आज झाले
कृष्णचि जाहले
शिल्प माझे... ९
रचना
©शिल्पा म वाघमारे
स शि बीड
दि.२०.१२.२०१९
कृष्णार्पित...
माझिया मना तू
आठवावा कृष्ण
साठवावा कृष्ण
श्वासांसवे... १
सावळे ते रुप
मोहक साजिरं
लावी मना घोर
माझा कृष्ण... २
कर्मकर्तव्यात
संसारा सांधले
गीताख्य वर्णिले
माधवाने... ३
जाणवाया कृष्ण
सांडा क्रोधकाम
कर्म ते निष्काम
कृष्णार्पित... ४
व्यापला तयाने
मनाचा गाभारा
देहभाव सारा
वाहियला... ५
नाम मोतीयांची
करिते गुंफण
अमृतसिंचन
जन्मोजन्मी... ६
न लगे रे मोक्ष
कृपाळा केशवा
तुझे पायी सेवा
घडो सदा... ७
अद्वैता, चैतन्या
तूच विश्वाधार
विश्वास आगार
वनमाळी...८
बांधूनी बंध हे
मुक्त आज झाले
कृष्णचि जाहले
शिल्प माझे... ९
रचना
©शिल्पा म वाघमारे
स शि बीड
दि.२०.१२.२०१९
