कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१९

जाणीव मलाही

जाणीव आहे रे सख्या मलाही
मी ही प्रयत्न करते
तुला समजून घेण्याचा
तुझी व्यस्तता जाणवत असते मलाही
तुझ्या विषण्ण करणाऱ्या चेहर्‍यावर
वाटतं तुला जवळ घेऊन प्रेमळ स्पर्श तो द्यावा अन्..
पण मी ही तुझं रात्र रात्र चाललेलं काम बघून
गप्प असते..
वाटतं तुझ्या ताणतणावात तू चिडलास तर.. म्हणून आवरते मनाला.. नि आतुरल्या ओठांनाही...

...
पण तू ही समजून घेशील ना
तुझ्या आठवानेही विरघळून जाणारी तुझी ही सखी
जिला तुझी सर्वात जास्त काळजी आहे
ती फक्त तुझी मनस्थिती बिघडू नये म्हणून
ओठ शिवून फक्त
हवं नको तेवढं विचारुन
दोन वेळचं जेवण बनवते..
पण तूही मला समजून घेशील ना..!
.
.
.
घुसमट होते रे..
पण मला वाटतं एकदा तरी वेळ काढ..
फक्त तुझ्यामाझ्यासाठी
म्हणजे प्रयत्न करुया पुन्हा ते आतुरतेले क्षण परतून आणण्यासाठी
कारण हे जीवन या येरझारा घालण्यात संपून जाईल.. तेव्हा आयुष्याच्या संध्याकाळी असे म्हणायला नको...
की "जगायचं राहूनच गेलं"

✍🏻शिल्पा म वाघमारे
स शि बीड
दि १३.१०.१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: