जाई जाई गंध राणी जाई सुगंधिता पवनासंगे गाते गाणी जाई प्रफुल्लित करी जीवा एक दिवसाची पाहुणी जाई मन पाकळी पाकळीत गुंफूनी बोले मधुर गंधाळ वाणी जाई ती मृदुला ती कोमला, चंचल मनमोहिनी, रसिक अन् अधिर स्वप्नकहाणी जाई रचना *शिल्पा म.वाघमारे* *स.शि बीड* दि _12.12.2018_
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा