कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

गुलाब 🌹 (दर्पण काव्यप्रकार)

गुलाब
राजा पुष्पजगताचा

गुलाब
नानाविध आकर्षक  रंगांचा गंधाचा

गुलाब
मनोहारी सौंदर्याचा अविष्कार अन् प्रतिक प्रेमाचा

गुलाब
तीक्ष्ण कंटकांतूनही सदैव सुहास्य फुलवणारा जणू मार्गदर्शक जीवनाचा

गुलाब
स्वार्थासाठी नव्हे तर इतरांना निर्मळ आनंदात मनमुरादपणे भिजवणारा वर्षाव मेघाचा

गुलाब


🖋शिल्पा
6/5/19, 08:17 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: