कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

वऱ्हाडी... हैदोस

हैदोस...



हैदोसच घातला व्ब्याॅ पान्यानं
कुटी कोळ्ला तं कुटी पानीपानी...

मिरुगाची वाट पायत जून सरला
अन् जुलैत तं सारी आणीबाणी...

इचारातच सरत चालले दिवस
घामाचं दाम पेरु, तं अबायाची मनमानी...

पुळेमांग करत घातली पुंजी मातीत
पन नाई मायासाटी त्याच्या डोयांत पानी...

भेगा पडूनशिन्या फाटत गेली भुई
आटत चाललं आता आसवातलंई पानी...

जठी नाई तठी, भलकसंच पडलं
हैदोसचं घातला ल्हान लेकरावानी...

जीवन तारनाऱ्या पान्यानंच मारलं
पन हेच तं आमच्या करमाची कायनी..

अंदारात चाललो एकविसाव्या शतकात
ईलासात इरली मानसं दीळशायनी...

आता तरी जाग ईन की नाई हो?
काळापुळे मानसं झाली दीनवानी...

रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
(अकोला)
दि.३०.०७.२०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: