विरहाग्नी...
प्रीत तुझ्यावर जडली
भान हरवलेच माझे
कशी वर्णू प्रिया सांग
शब्दही आज सारे तुझे.. १
हसे अंगणी सोनचाफा
माझ्या असल्या दशेवर
कावरीबावरी नजर
शोधे तुजला सैरभैर...२
तूफान चेतले रानी
प्रीत तुझ्यावर जडली
भान हरवलेच माझे
कशी वर्णू प्रिया सांग
शब्दही आज सारे तुझे.. १
हसे अंगणी सोनचाफा
माझ्या असल्या दशेवर
कावरीबावरी नजर
शोधे तुजला सैरभैर...२
तूफान चेतले रानी
भडकाच जणू उडाला
गुंतले मी नव बंधात
तूच ये ना विझवायला...३
विरहाच्या अंधारात
गुंतले मी नव बंधात
तूच ये ना विझवायला...३
विरहाच्या अंधारात
भयाण हे माझे जग
धगधगते अंगार देही
प्रीतफुला तू निववी धग...४
तूच उपचार व्याधीचा
असशी त्या तूच कारण
फुलव ना बकुळगंध
मज होऊ दे अर्पण... ५
रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
10/6/19
धगधगते अंगार देही
प्रीतफुला तू निववी धग...४
तूच उपचार व्याधीचा
असशी त्या तूच कारण
फुलव ना बकुळगंध
मज होऊ दे अर्पण... ५
रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
10/6/19
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा