कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

बाळाचा खेळ

बडबडगीत

बाळाचा खेळ 

बाळ चाले लुटूलुटू
बोलत  बोल चुटूचुटू..

हातात वाळे नादती
पायी पैंजण साजती.. 

खुळूखुळू बोले खुळखुळा
त्या पाहून हसतो बाळा.. 

चिऊताई कावळेदादा
रिझवती सदान् कदा.. 

भिंगरीची चाले गरगर
तिच्यामागे फिरे घरभर

लाल चेंडू गोलाकार
धरु जाता होई पसार.. 

धावते पों पों मोटारकार
बाहुलीसंगे बडबड फार..

असा चालतो बाळाचा खेळ
रडले की आई काढतेच वेळ...

रचना
© शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड
10/6/19, 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: