ओवी... आंगणाची* आंगणाची व्हती शोभा बाई सडा रांगोई... नं माय उठे झाकटीत गाईचं आने शे... न.. शेंदे इरीचं ते पानी घडगी-घडगी.. नं दगळाच्या इरीले त्या 'काप'सुताच्या दोरा... नं आज डांबरी रस्त्यानं शोभा आंगणाची गे.. ली दारापुळची तुयसाबाई बंगल्यावर चढ... ली सांध्याकायच्या पायरी येती सया न् गडणी हासत नाचत खेळ रंगे गं आंग..णी झाडंझुडं फुलफळं सावलीबी दाटवा...ट उन्हायात गारव्याचा बाई काय सांगू था... ट भरल्या त्या आंगणाची नाई होणार बाई स.. र आठोणीत झुरे मन कसं बदललं तंत.. र (तंत्र) रचना © शिल्पा म.वाघमारे स.शि बीड दि 28..03.2019
कृष्णार्पित काव्यशिल्प
- सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९
ओवी अंगणाची
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा