काव्यमय कोडे झाड ओळखलंस का बाळा मला...? मी उभा सदैव तटस्थ मज तमा न ऊनपावसाची झुंजण्या झगडण्या समर्थ टक्कर देत वादळांशी...१ मज निर्मिलेच विधात्याने फक्त फक्त देण्यासाठी अन्न वस्त्र अन् निवारा तत्परतेने पुरवण्यासाठी...२ जीव या भव्य सृष्टीतला समसमान मानतो मी कापलेत क्रूरपणे गळे माझे तरी साहणेच जाणतो मी...३ आधार क्षणोक्षणी होईन परी गर्व न ठावे मजला चिरानंद देत राहिन जरी भुईत थोडा रुजला...४ श्वास होऊन रे तुझा ज्योत प्राणांची तेववीन पिऊन विष भोवतालीचे वचन दात्याचे पाळीन....५ ओळखलेस का बाळा मला? मी होतो, आहे, असेलही सृष्टीची श्वासमाला टिकवाया स्वार्थ सारुन,जप कर्तव्यासही...६ रचना ©शिल्पा म.वाघमारे स.शि मालेगाव खुर्द. ता गेवराई जि बीड दि. 29.03.2019
कृष्णार्पित काव्यशिल्प
- सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९
❓६ काव्यमय कोडे... झाड
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा