कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

तंबाखूमुक्त माझी शाळा


तंबाखूमुक्ती


तंबाखूमुक्त माझी शाळा
तंबाखूमुक्त माझी शाळा
पण आपले गाव तंबाखूमुक्त करणे,
आता तुमचेही कर्तव्य आहे बाळा..||

आजोबा असोत किंवा बाबा
त्यांना ठाम सांगा तुम्ही
काहीही दाखवले आमीष तरी
पुडी आणणार नाही आम्ही ||

तुम्हास सारे प्रिय आहेत,
जाऊ देणार का त्यांचा बळी? 
पोखरते हो काया त्यांची 
ही तंबाखूरुपी अळी ||

आरोग्य आपले निरोगी राखण्यास
कुणी आपल्याला सांगावे का?
का आणि कशासाठी? ,
 एवढंच एकदा सांगाल का?||

निरागस या डोळ्यांत माझ्या
म्हणावं एकदाच निरखून पहा,
जीव आहे ना माझ्यावर
मग.... तंबाखू ही सोडून पहा||

तुमच्यासाठीच व्यसनमुक्तीचे
आज गातो  गीत आहे,
व्यसनमुक्त भारत होणे,
ह्यात आपलेच हित आहे ||                             

फॅशन आहे म्हणतात खुशाल            
पण विचार असू द्या भविष्याचा       
व्यसनचा फक्त विचारही       
 ऱ्हास आहे ना विवेकाचा! ||     

                    

रचना                       
श्रीम्. वाघमारे शिल्पा मनोहर
(स.शिक्षिका)
जि प प्रा शाळा मालेगाव खुर्द ता गेवराई जि बीड 
बीड
10/6/19

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: