कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

अवकाळी. ... (हायकू)

अवकाळी (हायकू)


वादळं वारे
पाऊस अवकाळी
जीवाला जाळी

अळी व रोग
पिकास बिलगले
स्वप्न भंगले

क्षणात विरे
बेगमीचा आनंद
विचार बंद

प्रदीप्त आशा
श्रमलो वर्षभर
ऊरी काहूर

दारा पोरांची
पुन्हा तीच का गत?
भूकेशी नातं

हतबल मी
रोज पुन्हा मरतो!
का मी जगतो?

संसार घाट
देवा तूच रे तारी
घाव जिव्हारी

रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
दि 05.04.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: