कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

चैतन्याची गुढी

चैतन्याची गुढी

वसंताचा मधूमोहोर
नटलेली ही वसुंधरा
घमघमाट चौफेर
येई शब्दांना फुलोरा

चैत्रमासी ऋतुरंगी
रंगलेले तन-मन
सरले साल जुने
आरंभले नूतन

चैत्रपालवी हसता
गाली आली खळी
आनंदाच्या दवांमध्ये
खुलते मृदू मनकळी

परीवर्तन नवलाईचे
गुढी चैतन्याची उभारुनी
आधाराची भक्कमशी
काठी मनांगणी ठेवूनी

हिरवाईचा ल्याली शालू
भरु चुडा संस्कारांचा
गाठी मधूर वाणीची
शोभतोय साज तिचा...

कडू वाटे जो शिस्तीचा
बंध तरीही अनमोल
दुःखाची वेदना देई
गोडव्यास त्या मोल...

गडू कळस शिखरी
मांगल्यास जपावया
शुद्ध विचारप्रवाह
सदोदित वाहावया...

रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि 6.4.19

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: