कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

@ मी पतंग... बालकविता

 *मी पतंग*

भिरभिर भिरभिर वाऱ्यावरती
मजेत उडतो बागडतो
कधी वर कधी खाली
अलगद गातो तरंगतो..... १

उंच उंच गगनामध्ये
भेटतो, बोलतो पक्ष्यांशी
काळ्याभोर मेघांशी आणि
झुळझुळणाऱ्या पवनाशी......२

असेच उडत जाता जाता
कधी वाटते उंचच जावे
डोंगराच्या माथ्यावरुनी
आकाशी जाऊन भिडावे.......३

चांदोबाच्या गाडीमध्ये
सैर करावी गगनाची
फिरत-फिरत भेट घ्यावी
ग्रह आणि ताऱ्यांची........४

स्वप्नांत स्वतःतच रंगताना
नकळत हरवत गेलो
काटाकाटीने भंगवले त्या
कटून मांजा खाली आलो.....५

रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि.19.8.2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: