झोपाळा गेला उडून पाण्यात दोन बेडूक राहती सोबत सोबत खेळत असती त्यांना दिसले दोन खांब होते खूप लांब लांब दोघांनी एक विचार साधला वेलीचा त्यांनी झोपाळा बांधला झोपाळ्यावर झुलता सोबत अवचित झाली एक गंमत लागले होते त्यांना कळू झोपाळा तर लागला उडू सहजचं वर बघतांना बगळा दिसला उडताना लक्षात मग येता धोका क्षणात साधून घेतला मोका पटपट पाण्यात घेतल्या उड्या संकटातुन वाचले बड्या प्रसंगावधान दोघांनी राखले म्हणूनच त्यांचे जीव वाचले रचना शिल्पा म.वाघमारे सहशिक्षिका Beed
कृष्णार्पित काव्यशिल्प
- सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९
@ झोपाळा गेला उडून.. बालकविता
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा