ससा बाई कसा
ससा बाई कसा
पांढरा पांढरा शुभ्र
गवतावर सांडलेले
जणू मखमली अभ्र...
ससा बाई कसा
लांब लांब कान
चाहूल लागताच
वळवितो मान
ससा बाई कसा
भित्राच फार
चटकन झुडपात
होई पसार
ससा बाई कसा
फुशारक्या मारी
मंदगती कासव
त्याचा गर्व हरी
शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द
दि. 29 08 2018
ससा बाई कसा
पांढरा पांढरा शुभ्र
गवतावर सांडलेले
जणू मखमली अभ्र...
ससा बाई कसा
लांब लांब कान
चाहूल लागताच
वळवितो मान
ससा बाई कसा
भित्राच फार
चटकन झुडपात
होई पसार
ससा बाई कसा
फुशारक्या मारी
मंदगती कासव
त्याचा गर्व हरी
शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द
दि. 29 08 2018
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा