कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

दर्पण छाया भीमराव











 
दर्पण छाया 

भीमराव 

भीमराव
घटनेचे शिल्पकार

भीमराव
दीनदलितांवरील अन्यायावर जबरदस्त प्रहार

भीमराव
स्त्री मुक्तीदाता व दिव्य ज्ञानाचा साक्षात्कार

भीमराव
ज्ञानाचा भुकेला पुस्तकप्रेमी अनोखा ज्याने ज्ञानग्रहणास्तव साहली उपासमार

भीमराव 
मनुजास केले सिद्ध संग्रामी लढावया करी देऊन शिक्षणाची दुधारी तलवार



भीमराव 
मानवांत मानवी संवेदनांची प्रखर ज्योत प्रज्वलित करणारा ज्योतीर्भास्कर

भीमराव
 सर्व सिद्धता मिळवण्यास  शिकवले ज्ञानाच्या बळावर


भीमराव
मानवंदना नित्य ज्या चरणांवर

भीमराव
हिऱ्यांतील कोहिनूर

भीमराव

रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका मालेगाव खुर्द
6/5/19, 08:50 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: