कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

निवडणुकीचे वारे

निवडणुकीचे वारे.. ..



निवडणुकीचे वारे आले
दिवस रात्र जणू मंतरलेले
प्रसार माध्यमे, काव्य मैफिली
सारे काही शहारलेले.. 1

ढुंकून कधी ना कुणी पाहिले
 सामान्य जनही तारे झाले
हात जोडत, पाया पडती
नेतेही विचलित वारे झाले... 2

रंगी नव्या ते रंगून गेले
नशेत अनोख्या झिंगून गेले
 आश्वासनांची भंग पिऊनी 
 प्रजाजनही गुंगून गेले... 3

असली कसली ही मोहमाया
 धुंदीत बायकोच्याही पडतो पाया
 झिंगलेल्या नयना काही दिसेना
 "कौन अपना कौन पराया"...4

 प्रचार घोषणा रण दुमदुमले
 शक्तिप्रदर्शन करूनि दमले
  लक्ष्य आता फक्त खुर्ची 
 टेबलाखालून जुळुनी आले... 5

शब्द शब्द तलवार दुधारी
एकावरती एक प्रहारी
जनआशांचा होऊ दे चुराडा
फक्त फक्त ती खुर्ची प्यारी....6

रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
6/5/19, 08:50 - 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: