संसार पसारा.... अष्टाक्षरी
पोटासाठी ....
कशी जीवनाची माझ्या
देवा रचली कहाणी
तुझी लेकरे सारीच
मग मी का दीनवाणी... १
भुईलाच थाटलेला
भग्न भकास संसार
बाळांसाठी भविष्याची
स्वप्ने झाली निराधार...२
पोटातल्या रानी सदा
आगडोंब उठलेले
दुष्काळच छाताडात
पाजू कशी मी तान्हुले?... ३
पाणी पीठात कालवी
पाणी डोळ्यांत आणुनी
पोरी कोरड्या घशाला
टाक आता ओलावूनी...४
पोटासाठी तुझ्या माझ्या
रोज नवे करु काय?
माया वेडी धावते नि
आखडती हात पाय... ५
धनी घालतोय घाव
लोहावर - भुकेवर
नीज बाळा, जाऊ दे रे
लावू दे 'त्या' हातभार...६
रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि. जि प प्रा शाळा,
मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि 25.12.2018
अष्टाक्षरी
पोटासाठी ....
कशी जीवनाची माझ्या
देवा रचली कहाणी
तुझी लेकरे सारीच
मग मी का दीनवाणी? ... १
भुईलाच थाटलेला
भग्न भकास संसार
लेकरांच्या भविष्याची
स्वप्ने झाली निराधार...२
पोटातल्या रानी सदा
आगडोंब उठलेले
दुष्काळच छाताडात
पाजू कशी मी तान्हुले? ... ३
पाणी पीठात कालवी
पाणी डोळ्यांत आणुनी
कधी कोरड्या घशाला
टाकतेया ओलावूनी...४
पोटासाठी तुझ्या माझ्या
रोज नवे करु काय?
मन धाव घेई नभी
आखडती हात पाय... ५
धनी घालतोय घाव
लोहावर - भुकेवर
बाळा निजवून शेजी
लावी तया हातभार...६
जरी राबतो उन्हात
समाधान खुले मनी
सुख देई आभाळाचं
देवा आमुच्या पदरी...७
रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि. जि प प्रा शाळा,
मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा