कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

गाणे संसाराचे

: गाणे संसाराचे...


प्रीतफुलांचे ताटवे सुगंधी
जीवनाच्या या वेलीवरती
संसाराची मग बाग मनोहर
फुले अनोख्या वळणावरती...१

आरोही गुंजला नभांगणी 
अनुरागी तो स्वरमाधुरी
अन् सूर स्नेहमयी कोरले
ओल्या मनःपटलावरती... २

स्पर्श सख्याचा हाय मखमली
उमलली तनू पाकळीपरी
तरारलीच वैशाखी राने
रुक्षता मग गाळून सारी... ३

वाहे मंद्र तर  कधी तार
सूर लाट चढतीची बेधुंद
कर्तव्याचाराची तार छेडली
जपण्या अविरत हिरवा छंद...४

क्षण ते अलगद स्वानंदाने
हृदयमैफिलही शहारती
मंजुळ तान ओठांवरती
गाणे संसाराचे गुणगुणती... ५

रचना
 ©शिल्पा म.वाघमारे
दि. 14.12.12008
10/6/19,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: