कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

मैत्री.. (दर्पण काव्यप्रकार)

मैत्री
मनाचे मिलन


मैत्री
जीवनवाटेवरील सुंदर एक वळण

मैत्री
स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे स्पंदन

मैत्री
सर्व नात्यांहून अनोखे विश्वासाचे अतुट असे मुक्त बंधन

मैत्री
मनसोक्त भरारी घेण्यासाठी मोकळे आकाश आणि सुप्त चैतन्य दर्शवणारे दर्पण

मैत्री

रचना
© शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड.
दि. 07.03.2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: