अंधाराची पहाट रवी येतो चढूनिया, बाई माथा डोंगराचा अंधाराची होते पहाट, गर्व हरे काळोखाचा...1 झाडीते गं मी अंगण, हुरूप येतो पहाटेला कमरेला नाही धीर, उभा जन्म संसाराला... 2 दळते गं, मळते गं, हसे भाकरी गालात वाट पाहे शिदोरीची, धनी उभा गं दारात... 3 मायेला जी माया, सासू कशी ती जाणे ना, तिच्या लेकीस जपे ती, मज लेक का मानेना... 4 घामाझोकील हा जीव, सदा कामात कुटला, हात फिरवी जो माथी, आज बाप कुठं गेला... 5 क्षणोक्षणी माझ्या मनी, दाटे कसले काहूर, मायेच्या पंखांवरी,थेट गाठावे माहेर... 6 सांजेला सांजवात, रात सजनाची मीठी, पाडे विसर दुःखाचा, जन्म वाहे तयांसाठी... 7 डोळे मिटता रवीने, पुन्हा काळोखाचा थाट, स्वप्नं लोचनी अधुरे, पहाटेच्या काळजीत... 8 रचना शिल्पा म.वाघमारे स.शि बीड दि. 24.02.2019 10/6/19,
कृष्णार्पित काव्यशिल्प
- सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९
अंधाराची पहाट.. ओवी
लेबल:
सांस्कृतिक मंडळासाठी...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा