नकळत सारे घडले
रात ही राजसा मधुमिलनाची
नवल हे नकळत सारे घडले
संपली सख्या प्रतिक्षा जन्मांची
जणू दुग्ध शर्करी विरघळले *१*
मोहरलेल्या रजनीलाही
नशा चढावी पुनःपुन्हा
जाळ्यात ओढला जाऊनी
घडू दे ना तो मधूर गुन्हा *२*
स्नेहमिलन होईल दो जीवांचे
विचारानेच काया बघ फुलली
माळशील ना गजरा कलिकांचा
लटकेच लाज बघ गाली आली *३*
शृंगार बेगडी नकोच मजला
गालावर अवचित येईल लाली
तव स्पर्शाचे मृदू मयूर पिसारे
फिरता मम् कोमल तनूवरी *४*
आठवानेच रंग हा अधरी
सेजेवर होईल काय दशा
चूरचूर जरी लाजेत नाहले
चिरस्मरणीय होऊ दे निशा *५*
रचना ✍️
शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
दि.9.4.2019
रात ही राजसा मधुमिलनाची
नवल हे नकळत सारे घडले
संपली सख्या प्रतिक्षा जन्मांची
जणू दुग्ध शर्करी विरघळले *१*
मोहरलेल्या रजनीलाही
नशा चढावी पुनःपुन्हा
जाळ्यात ओढला जाऊनी
घडू दे ना तो मधूर गुन्हा *२*
स्नेहमिलन होईल दो जीवांचे
विचारानेच काया बघ फुलली
माळशील ना गजरा कलिकांचा
लटकेच लाज बघ गाली आली *३*
शृंगार बेगडी नकोच मजला
गालावर अवचित येईल लाली
तव स्पर्शाचे मृदू मयूर पिसारे
फिरता मम् कोमल तनूवरी *४*
आठवानेच रंग हा अधरी
सेजेवर होईल काय दशा
चूरचूर जरी लाजेत नाहले
चिरस्मरणीय होऊ दे निशा *५*
रचना ✍️
शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
दि.9.4.2019
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा