कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

स्फुर्तीस्त्रोत भिमराया...

स्फुर्तीस्त्रोत भिमराया... 

त्या काळोखाच्या रात्री
जीणं भयान वादळी
दलितांच्या जीवनात
माखलेलीच काजळी... ||1||

पशुपक्षी मुक्त सारे
दलित विटाळ संसारी
जन्म जरी माणसाचा
दशा गुलामांच्या परी... ||2||

तिमीराच्या दुनियेत
लख्ख सूर्य तेजाळला
कर्तव्याच्या सागरास
त्याने वाहिले स्वतःला... ||3||

मानवाची संवेदना
मानवासाठीच संपलेल
ज्योती ज्ञानाची प्रदीप्त
 भीमरावांनी जागवली... ||4||

माता-भगिनींस मुक्त केले
 जखडलेल्या बंधनातून
हक्क मागून ना मिळती
सांगितले घ्या झगडून... ||5||

दिव्य ज्ञान लेखणीने
विचारांना दिली दिशा
परास्त कुत्सित विचार
सरली ती क्रूर निशा... ||6||

अद्वितीय भेट संविधान 
रूप जगण्याचे पालटले
हिऱ्यांतील कोहिनूर भीमा 
सत्कर्मांतून तूं दावियले... ||7||

शिक्षणाची समशेर दिली
सिद्ध केले रणी लढावया
स्फुर्तीस्त्रोत झाले बाबा
पंख दिले नभी उडावया... ||8||

रचना 
© शिल्पा म.वाघमारे
स.शि. मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
दि.10.04.2019