*शाळा एक मंदिर*
शाळा म्हणजे एक मंदिर
अन् शिक्षक माझा पांडुरंग
त्यांच्या मार्गदर्शनानेच
जीवनात येईल खरा रंग
वर्गपाठ नि गृहपाठ
हाच हरीपाठ माझा
नित्य वाचनानेच होईल
मी ज्ञानाचा राजा
परिक्षार्थी नव्हे हो
मी बनेल ज्ञानार्थी
माणूसच होईल आधी
नव्हे लोभी वा स्वार्थी
विद्येच्या पंढरीतला
मी अज्ञानाचा 'वार'करी
ज्ञाना-तुका -नामा सम
जनांचा होईल कैवारी
माझ्या प्रत्येक कर्माची
शाळाच होईल साक्ष
या मानव जन्मामध्ये
कर्तव्य हाच मोक्ष
रचना📝
शिल्पा म.वाघमारे
बीड
10/6/19
शाळा म्हणजे एक मंदिर
अन् शिक्षक माझा पांडुरंग
त्यांच्या मार्गदर्शनानेच
जीवनात येईल खरा रंग
वर्गपाठ नि गृहपाठ
हाच हरीपाठ माझा
नित्य वाचनानेच होईल
मी ज्ञानाचा राजा
परिक्षार्थी नव्हे हो
मी बनेल ज्ञानार्थी
माणूसच होईल आधी
नव्हे लोभी वा स्वार्थी
विद्येच्या पंढरीतला
मी अज्ञानाचा 'वार'करी
ज्ञाना-तुका -नामा सम
जनांचा होईल कैवारी
माझ्या प्रत्येक कर्माची
शाळाच होईल साक्ष
या मानव जन्मामध्ये
कर्तव्य हाच मोक्ष
रचना📝
शिल्पा म.वाघमारे
बीड
10/6/19
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा