कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

नवरोबा

नवरोबा

बायकांच्या गप्पांचा
विषय असतो ठरलेला
सासू नि नणंदेनंतर
नवराच असतो भरलेला...

किती लावतो जीव नि
बायकोच्याच पुढेमागे
तरी मैत्रीणीजवळ
उकलते चुगल्यांचे धागे...

सासू-सुनांच्या रटाळ
त्या गुंतलेल्या मालिकांत
बिच्चारा थकून आल्यावर
चहाकप देतो तिच्या हातात...

तरी थोबाडाचा पट्टा तिच्या
गिरणीसारखा राहतो सुरु
सांग म्हणतो बाई आता
जेवायला काय बेत करु...



रचना
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड
25.12.2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: