कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

@ बालकविता आले बाप्पा मोरया

संकल्प करुया.... मोरया मोरया

आले बाप्पा मोरया
गड्यांनो आनंदाने नाचूया
घर, शाळा, गाव, देश
स्वच्छता ही राखूया.......१

बाप्पा आज आले घरी
सेज मखर सजवुया
दात घासून केस कापू
शरीर स्वच्छ ठेवूया........२

आरास ती लक्ष दिव्यांची
रांगोळी साकारु या
उठून सकाळी वेळेवरती
शाळेमध्ये जाऊया........३

गंधित कुसुमांच्या माळा
त्या विनायकला अर्पूया
जेवणाआधी धुवून हात
ताजेच अन्न खाऊ या........४

रुचकर गोड लाडू मोदक
चला गणेशासाठी करूया
प्रदूषण मुक्त करूया भारत
प्लास्टिकचा वापर सोडूया.....५

आरती त्या गजाननाची
मनोभावे आपण करूया
नको आता तो नाद कर्कश
संगीत मधुर ते ऐकूया........६

आजवरच्या चुका नि खोड्या
बाप्पा चरणी वाहूया
स्वयं शिस्तीचे धडे गिरवली
सफल जीवना बनवूया......७


रचना ✍️
शिल्पा म.वाघमारे
स.शि मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
13.09.2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: