अद् भुत रस पाऊस... चिंब चिंब.. भयाण शांतता पसरलेली मनही चिन्नभिन्न होतं रात्रीत धुंदता नि खिन्नता मनात आज तर अगदी कशातच मन लागत नव्हतं.. गेले दोन दिवस तर झाले तू नव्हतास जवळ... पण का कुणास ठाऊक क्षण क्षण जड झालेला आज तर असह्यच अगदी जणू धावत.... नाही उडत यावे पण शक्य का होते सारे आज वाढदिवस ना लग्नाचा पुन्हा त्या.... आठवाने चिंब भिजण्याचा पण तुझ्याशी बोलावे... तर तू असा वैतागलेला इकडे आभाळासह मनातही माझ्या दाटून तूच आलेला... तो गडगडाट पुन्हा पुन्हा फक्त डिवचत होता मनाला.. म्हणे आता मी बरसणार... पण.. तुझ्यात तीच शुष्कता तुफान होऊन वाहणार... बांधच फोडले अश्रुधारांनी... अन् वाहू लागल्या सुसाट... महापूरातील नदीवत.... कडाडून एक वीज मजवर हसून गेली अन् गच्च डोळे मिटले... काय... कसे.... न कळले ना वळले... तिथे प्रश्नालाही नव्हता थारा... नि दुसर्याच क्षणाला मी त्या गुलाबी मीठीत... मोहरलेल्या मोगऱ्याच्या गंधात नि प्रितीच्याही.... बरसत होता तो ढग गडगडणारा... आणि.....तू ही.... रचना शिल्पा म.वाघमारे स.शि बीड
कृष्णार्पित काव्यशिल्प
- सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.
मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९
पाऊस.. चिंब
लेबल:
कृष्णार्पित काव्यशिल्प
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा