कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

प्रारब्ध

प्रारब्ध....


प्रारब्ध म्हणजे तरी काय? 
तुझ्या पुर्वजन्माचे ते संचित
मानव जन्म सार्थकी लागू दे
ढळू नको ध्येयापासून किंचित  १


विकारांच्या अधीन होऊन
माणूस करत राहतो कर्म
मनःचक्षू  ते झाकुनिया
विसरुन जातो मानवधर्म....२


स्वतःच कर्म लेखणीतून
तो प्रारब्धगाथा रचतो
नि वाईट पडलं पदरी की
खडे इतरांवर फोडतो..  ३


बरेचदा गफलत करुन
लोक संभ्रमात जगतात 
नशीब आणि प्रारब्धाला
एकाच तराजूत तोलतात... ४


कर्म मार्ग बदलाच्या प्रयोगाने
नशीब एकदाचे जाईल बदलून
पण प्रारब्धाच्या पार जाण्यास
मार्गच नाही हरीनामावाचून.... ५


रचना ✍️
शिल्पा म.वाघमारे
सहशिक्षिका बीड
18.11.2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: