कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

जिद्द

जिद्द 


आणि तरीही मुक्त हासते
गीत गाताना जीवनाचे
उन्हाचे नि दारिद्र्याचेही
जरी चटके नशीबाचे... १

ना झाडी ना छाया शहरी
इवला दमला जीव जर
पैशांच्याच वाटेवरती
पाण्याचेही आहे घर... २

पोटासाठी वणवण सारी
विकण्या आंबे दारोदार
पोटालाया बसतो चिमटा
तरी मदतीला सदा तयार.. ३

कधी शाळा कधी दांड्या
हे तर झाले आता नेहमीचे
पुर्वी बाई करतीही शिक्षा
त्यांनाही झाले ओळखीचे... ४

मात करुनी संकटांवरी
हरविन मी ही तिमीराला
ऊन्हे झेलुनि, प्रकाश पेरीन
आकाश दाखविन आईला... ५

रचना
शिल्पा म.वाघमारे
स.शि बीड
दि. 19.12.2018

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: