कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

बुधवार, ६ नोव्हेंबर, २०१९

चिऊताईचे गुपीत🤫

चिऊताईचे गुपीत🤫

मीनूच्या स्वप्नात
चिऊ ताई आली
कानात गुज काही 
सांगून गेली

पहाटेच मग
मिनू उठली
दात घासले 
अंघोळ केली 


कालचा गृहपाठ 
उरकून घेतला
आई बाबांना  ही
नमस्कार केला

 स्वतःच सगळी
केली तयारी
शाळेला मग 
निघाली स्वारी

आई-बाबा तर 
झालेच चकित
आज हे काय 
घडले अवचित

अशी काय ही 
जादू घडली
मिनू आमची 
शहाणी झाली

कोणा न कळे 
झाले काय बाई
गुपित सांगून 
गेली चिऊताई

रचना 
शिल्पा म.वाघमारे
       स.शि.मालेगाव खुर्द
ता गेवराई जि बीड
10/6/19

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: